सोमवार, २८ सप्टेंबर, २००९

Can't Help It!

बोटाने पेन गच्च पकडून मनात येणाऱ्या विचारांना, ते ज्या प्रकर्षतेने येतील त्या-त्या भावनेने कोऱ्या आणि अगदीच कुमार भासणाऱ्या कागदावर सहजपणे उतरवणं किती वेगळं आणि तेच सगळं मनातलं अर्धं लक्ष laptop कडे आणि अर्धं keyboard कडे ठेवत लिहीणं किती वेगळं…नाही का? व्यवस्थित font निवडा, तो नीट्पैकी समजून घ्या आणि मग लिहायला बसा, लिहीत-लिहीता सतत ते document save करत रहा…आणि stuff!! भावनावेगाने लिहायला बसावं आणि मग आवेग ओसरत जाईल किंवा interest संपत जाईल तसं-तसं document type होत राहील; असली काही योजना सध्यातरी available नाही! पेन, वही, शाई यांचं तसं काही नाही…अजिबातच नाही! सवय कशाची तर, पेन आणि वहीची…मग त्रास होणारच ना?! गाढवाला लहानपणापासून त्रासाची कामं शिकवली आणि एके दिवशी कमी त्रासाचं काम दिलं तरी त्याला त्रास होणारचं, तो कमी होतोय याचं भान नाही पण पुर्वी किती छान होतं, याचा फुकटचा अभिमान!
प्रत्येक गोष्टीला काही फायदे-तोटे असतातच…पेन आणि कागदावर लिहीणं असंच काहीसं फायद्या-तोट्यांचं…पण डोळे झाकले आणि पेन-कागद डोळ्यांसमोर आणले तर आठवत ते फक्त एक तरल romantic वातावरण…त्यात काहीसं अद्रुश्य असं काही, जे तिथेच आहे, मात्र ते तिथे असण्याचा भास वाटतो फक्त…आठवतात गुलाबी कागदांवर निळ्या शाईने रेखाटलेली प्रेमाची स्वप्ने, तुटलेल्या प्रेमाच्या, आशा-अपेक्षांच्या रंगी-बेरंगी कविता, कवितांच्या वेली, संगीताचे सुरमयी बोल, मस्तीखोर चटक-मटक doodling ची रेखाचित्रे…काहीतरी abstract art…कागदांवर रेखाटलेले dating चे programs; “मला या-या वेळेस call कर…” वगैरे वगैरे!! आणि सर्वात height म्हणजे आपले कधीच जुळू न शकणारे हिशोब!! तसं काही लोकांना पावती पुस्तकं वगैरे आठवत असेल, पण… (who cares!!)
Laptop म्हटला की मला पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे माझा anti-glayer चष्मा….मग आपसूकच डोळ्यांवर धुळीसारखी जमणारी झोप आणि डोळे कोरडे पडतात म्हणून पर्यायाने येणारे artificial tear drops!! किती unnatural वाटावं असं सगळं नाही का?! कागदाशी संबंध तुटला, हात आणि पेनाचा संबंध तुटला, मन किंवा मेंदू म्हणा हवं तर…त्याचा आणि शरीराबाहेर पडणाऱ्या खाजगी मतांचा संबंध तुटला…उरली ती फक्त digital माल-मत्ता!!
मी इथे लिहावं, कुणीतरी ते पहावं… “अरे वा! छान…keep writing” comments मारव्यात…कुणीतरी ते copy करावं आणि कुठेतरी post करावं…ते लिखानही कुठून आलेलं तर त्याच-त्या माझ्या कोरड्या, artificially रडणाऱ्या डोळ्यांतून, मी smoothly type करून enter केलेल्या माझ्या multitasking करणाऱ्या मेंदूतून आलेलं…मेंदूतूनच!! Imagine, तुम्ही एका word document मधे तुमच्या होणाऱ्या किंवा झालेल्या प्रेयसीला प्रेम-पत्र लिहीत आहात… “प्रिये, हा चंन्द्र आज एवढा फिक्का का पडलाय…तू घराबाहेर तर नाही ना पडलीस…” वगैरे! शक्य नाही होत अश्या गोष्टी imagine करणं…isn’t it? उगाच अवघड वाटतं…पण करणार काय? Can’t help it!
सगळेच आता वापरतात, म्हणून आपणही वापरायचं…मनात कुठेतरी भिती आहे आपण एकटेच मागे राहून जाणार तर नाही ना! म्हणून वापरायचं…सोपं पडतं म्हणून वापरायचं आणि मग अश्या वेळेस essence ची पर्वा करतं कोण?! इतरांचं माहीती नाही मला, पण एवढं मात्र नक्की लहान-पणापासून ज्यांचा लळा होता त्यांना असं मागं टाकून देणं जीवावर येतं…ते तेवढं घ्यायचं आणि लिहीता-लिहीता एखादा खरोखरीचा अश्रू सोडून द्यायचा वाहणाऱ्या पाण्यात…असाच सहज…थोडातरी essence रहावा म्हणून. आणि मनातल्या मनात बरळायचं थोडा change हवा बरं का!
- पंकज कोपर्डे
६.०९.०९ पुणे

सोमवार, ३ ऑगस्ट, २००९


आपण आपल्याच आयुष्यात किती अडकून पडलेलो असतो ना…ते खिडकिपल्याडचं निळं आकाश, मागच्या कैक दिवसांपासून पाउस पडतोय म्हणून खास हिरवे झालेले नेहमीचेच उघडे-बोडके डोंगर, कित्येक दिवसांपुर्वी पाहिलेलं वडाचं पिल्लू…आणि त्याच्यावरचं दयाळाचं इवलंसं घरटं…

“काय झालं असेल रे आता त्या पिलाचं? मोठा वड झाला असेल नाही?! इतका मोठा की, आपण मस्त सूर-पारंब्या खेळू शकू!! आणि दयाळाची सगळी पिल्लंही चांगली मोठी होवून, आकाशात भराऱ्या घेत, शिट्ट्या मारत पोरींभोवती पिंगा घालत असतील…ते डोंगर…shit, बावड्या, च्यायला काय गार वारा साला?! असा झोंबला होता संपूर्ण अंगालाच आणि तिथंच अगदी साष्टांग नमस्कारही घातला होता चक्क! त्या डोंगराच्या भव्यतेवर प्रसन्न होवून!! हा हा! आणि ते निळं आकाश…(सुस्कारा)…तिनं आणि मी दोघांनी एकत्रच चित्रं काढली होती, त्या आकाशात! अगदी घराच्या भिंतीवर आपलं मूल रेघोट्या मारतं ना, अगदी तशीच…मग कुठं गेली ती आता?”
ती गेली आता उडून, निळ्याभोर आकाशात, स्वत: काढलेली चित्रं परत सगळी आणायला…
गेली मात्र आणि परत फिरकली नाही…म्हणून तर सध्या तुला ह्रुद्याशी धरून खिडकीत असतो मी बसून…

“पण मग चल ना…बाहेर जावू, पुर्वीसारखंच…ते सगळं तिथल्या-तिथंच आहे की?”

Hmm…
सगळं खरं रे मना…पण सगळं ते तिकडे, खिडकीपल्याड…तू सध्या इकडेहेस, गजांआड!!
तुला काहीच कल्पना नाही, काय-काय घडून गेलंय, तुझ्या पाठीआड!!!

मंगळवार, २३ जून, २००९

शनिवार, ६ जून, २००९

कात्री


दिवसाच्या भरगच्च चित्राला कात्री लागावी आणि संध्याकाळीचा कपटा तेवढा हरवून जावा...तसं आज काही घडलं!

आयुष्यातला एक हरवलेला पाउस आणि कात्री लागलेली एक सोनेरी संध्याकाळ बाहेरच्या बहकलेल्या वा़ऱ्यात मांजा तुटलेल्या पतंगांसारखे...मी माझ्या फुल्ली एअर-कडिशन्ड, हायली इक्विप्ट लॅबच्या गॉगल ग्लासआडून पाहिले!

असे अजून किती दिवस, मी कात्री लावणारेय मनाला...देवच जाणे!

शुक्रवार, ५ जून, २००९

एक्सा...


ती विचारायची; "बोल कुठं जायचं?"

"Side-walk, coffee house, CCD?" तिच्याकडे पर्याय होते; नव्हतं असं काहीच नाही! आणि निर्णयांना होवुन जायचो...मी ठार बहीरा!

हिरवा सिग्नल लागला की ती म्हणायची, "चल चंद्रावर जाऊ!!"
आकाशात एक चन्द्राची कोर...छोटंसं लॉन, त्यात नाचणारे मोर; दगड-धोंड्यांचाच एक छोटासा धबधबा, चमचमणाऱ्या चांदण्यांचा चमचमणारा दिवा...तिथं फ़क्त मी आणि ती...आणि काही ठरावीक डोकी...तिथं येण्याचा रस्ता फ़क्त तिला माहिती!

"चल चन्द्रावर जाऊ!!"

क्षणिक

क्षणिक

क्षणिक- क्षणिक म्हणून लिहीत जावं आणि ते क्षण संपेपर्यंत किंवा मन संपेपर्यंत उघड्या कापरासारखं चित्रात किंवा गाण्यात किंवा पानात किंवा आतल्या-आत, मनात…उडून जावं-विरून जावं आणि आठवण काढण्यासारखं त्यात होतं तरी काय? असा साधा प्रश्नही न पडता…ते सगळं गेलं तसंच, आठवणीतूनही विरून जावं; हे असलं सगळं, या एवढया मोठ्या जगात…कुठे-ना-कुठे, कुणी-ना-कुणी लिहीत असेल-गात असेल-रेखाटत असेल…

आणि क्षण संपला की, तंगड्या टेबलावर टाकून डोळे झाकून बसत असेल! क्षणाचा आनंद असा पानात गेला की, तो क्षणही नुस्ताच वाया नाही गेला; क्षणाचा आनंद असा गाण्यात गेला की, तो क्षणही गाणं ऐकलेल्या सगळ्यांनी क्षणभर तरी अनुभवला!

लिहीलेले कागद जपून ठेवलेत त्यांनी आणि क्षणांची छायाचित्रे काढावीत, तसलं अजब भारी नुस्तं अक्षरांनी घडवलंय त्यांनी! असं घडतं कसं काय? कुणी शोध लावला याचा? म्हणजे…तुम्ही खिड्कीत बसा - घाईगदबडीत - जीवनाचे प्रश्न सोडवत - आनंदात बायकोबरोबर(?) किंवा इतर कुठल्याही अवस्थेत(!!) आणि डोळे सताड बाहेर ठेवा… वारा सुटेल-पाउस येईल-गालांवर हसू किंवा गाणं येईल! चेहरयावर वारा लागेल; पाण्याचे उडलेले थेंब लागतील…भजी तेलात आनंदाने डुब्या घेतील आणि रेडिओवर लताचं “गिला गिला पानी” लागेल!

“का घडतं हे? कोण घडवतं हे? हे एवढं सगळं करायचं असतं; अशी प्रथाच कुणी पाडली मुळात? आणि एवढ्या सगळ्या घटनांचा शोध तरी कुणी लावला?” असे प्रश्न विचारणं मुळातच किती मुर्खपणाचं आणि अरसिकतेचं द्योतक आहे; असंच वाटणार प्रत्येकाला! यावर उत्तर म्हणून तुम्ही म्हणाल, “आता वाटतं…त्याला काय करणार?”

बघितलं क्षणांचा हा सुरूंग किती भयानक आहे!

तो प्रत्येक नुक्ताच जन्मलेला क्षण आणि प्रत्येकाचं आपलं-आपलं मुठीएवढं मन…दोघं नुस्ती जुळी भावंडं आहेत!

- पंकज

दिल्ली (२४/०५/०९)