काळ्या कॉफीत तरंगणारे ढग,
वाहणारी नदी, शांत सारंग,
माझ्या दुनियेतला अद़्भुत
क्षण,
नि भरकटलेले एक मन.
आज, उद्या, किंवा परवा-तेरवा,
दिवसांचा क्रम, थोडा
मोडका,
अशातही शरीरांची तहान,
वृद़्ध वृक्षाच्या कण्याचा
ऒंडका.
तू दोन ढग प्यायलेस
का?
पोकळ आभाळ माझ्यासाठी,
वाऱ्यावरती नदीच्या
काठी,
सोडवतो विचारांच्या
गाठी!
ती थंड हवा, तो शहारा,
मला न तुला, ना, मग
कुणाला?
अंगावरी येई दवाचा पसारा,
गोठवून ठेवी, शब्द-शब्दाला.
हे नातं कसं तरल, मृदु,
नाजूक;
तरी कुणी कुणाचे कुणास
ठाऊक?
संग पडला की जीव जडला?
ढग विहरतात, आभाळ मूक;
तव काळजात मी रसभरून,
नि तव माझ्यात भिनून…
-
पंकज
कोपर्डे । १० जानेवारी २०२६

