गुंतलेल्या कोणातही
संग-ढंग न राहिला
शांत आणि भारदस्त
सागर एकट्याने पाहिला
आत व्यथा कोंडलेली
हात न पहुचे तिथे
भिती आत गोंदलेली
हाक जाई खोल जिथे
सारला पसारा,
व्यस्त कुणी मांडलेला
झुंजार झाला वारा,
अंग कापीत चालला
मी तरी शब्दांत ओतूनी
उगा झटकले मन
आत अजुनी बोलतात
तेच व्यथांचे कण
शांत आणि भारदस्त,
सागर एकट्याने पाहिला
जेव्हा खोल त्या खोलीत माणूस,
साद शोधत राहिला.
- पंकज
ऑक्टोबर २०१६