ती शांत दुपार
आणि त्यात फोडणीचा वास;
घरात घर केल्यासारखी
चौकटांची खिडकी;
कर्ररकर आवाज करत
झाडांच्या फांद़्या,
वाऱ्यावरती सळसळ नुसती
पिकली पानं गळकी.
ऊन नाही, नाही सावली,
उदासीनता आहे नुस्ती
थंड वारा वाहून आणिक
पापण्यांवरती सुस्ती.
पोटातूनही येते गुडगुड
ती तिथेच आपली बरी;
ती शांत दुपार
आणि त्यात फोडणीचा वास.॒॒॒(@ IISc. sometime in September)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा