…वाट सोनेरी होती. जंगल
गुणगुणत होतं. जंगलाची वर्दळीची वाट. मधेच एक अजगर आडवा. पोट ट्म्म. सुस्त शरीर. अधून-मधून
तोंडातून बाहेर पडणारी लवलवणारी जीभ. दोन दिवस होऊन गेले, तसाच तो तिथे. हलू वाटत नाही,
चालू वाटत नाही. एक-दोनदा रात्रीच्या वेळी अस्वलानं डिवचलं, तसा त्याच्या अंगावर चालून
गेला. मुंगसानं दुपारी फार त्रास दिला…
पोटातलं चिंकाऱ्याचं पिल्लू जळत होतं आत हळू-हळू.
एखाद दिवस आणखीन आणि ते पचून गेलं असतं सगळं…वन्यजीव छायाचित्रकारांची एक जीप अंगावरून
गेली; डोकं वेगळं, शेपूट वेगळं; मधलं टम्म पोट चिकाऱ्याला विरघळवत एकटंच उरलं.
मेला अजगर तरी त्याचे
फोटो प्रदर्शनभर कौतुकास्पद ठरले; “A sad roadkill” या नावानं छायाचित्रकार टम्म फुगले.
मेला अजगर.
Pankaj
24.05.2010
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा