कारण अभ्यास...
आभाळाला एक भोक पडलेलं. मगरी आणि सुसरी, पांढऱ्या मानेचे करकोचे, heartbreak झालेले बोके, चिकट गोगलगाया, आत्मा हरवलेल्या काया, कुत्र्यासारख्या पडत होत्या अंगावर! हे एकदा घडलेलं नव्हतं; सतत घडत राहिलेलं. भोकाची त्रिज्या कमी-जास्त आणि पडणारे प्राणी चित्र-विचित्र, इतकाच काय तो फरक. मी चुकीच्या जागी बसलोय किंवा बसवलो गेलोय अशी भिती तोंडावर सतत बाळगलेली. बाळगलेली बरी म्हणजे शंकेला वाव उरत नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या फळ्यावरती रेघोट्या मारणाऱ्या पाठीकडे पाहिलं. शेजारच्याच स्क्रीनवरती काही आकडेमोड झालेली; ठळक शब्दांत काही सुविचार लिहीलेले; काही आकृत्या अबोल मेलेल्या आणि त्यांच्यामधून बाण इकडून तिकडे. लढाई संपल्यावर मेलेल्या-मारणाऱ्यांचा हिशोब सुरू असतो. किती वेळ गेला असेल मधे? मी एकदा पापण्या मिटून पुन्हा उघडेपर्यंत. दहा ते पन्नास वर्षांपैकी कितीही किंवा शंभरही. ज्ञान आणि वेळेच्या अक्षांवरचा एक बिंदू पकडून मी सुरू केला होता प्रवास पंधरा मिनीटांपुर्वी आणि पापण्या मिटल्या. मी ओढ्यात एक नाग बेडकाला पकडून बसलाय असं बघितलं. कितीतरी वेळ…पंधरा मिनीटांपेक्षा कमी…तो नाग त्या बेडकाला फक्त पकडून होता दातांत. आणि थकला की काय? सोडून दिलं त्यानं बेडकाला नि गेला कुठेतरी खड़्ड्यात! खुर्चीवरती मी जरा पसरलोच होतो; सावरून बसलो. आजूबाजूला पाहिलं आणि स्वत:ला वेळेचं भान आहे का? असं विचारलं. उघड्या जबड्यात माझ्या किती माशांनी interest घेतला असेल, काय माहिती! जेव्हा जबडा बंद केला होता, उठल्या-उठल्या, तेव्हा त्यात एक सोन्यासारखा केस सापडला होता. तो ओकू वाटला होता; पण सोन्यासारखा म्हटल्यावर ओके वाटला होता. सोन्यासारख्या केसांची एकच मुलगी होती वर्गात, आजूबाजूच्या चार बाकांपैकी एकावर बसलेली. म्हटलं, तो केस ठेवून द़्यावा लाकडी पेटीत आणि पेटी ठेवावी खोलीवर. जमलंच-झालंच तर होईल evolution!

समोरची पाठ अजूनही खरडत होती equations आणि दगडासारख्या
डोक्यात माझ्या कसलाच नव्हता mention! आजूबाजूलाही काही मेणासारखे पुतळे बसलेले. काही
हलणारे-डुलणारे, काही डुगडुगणारे, काही वितळणारे. वावटळ यावं तशी एक जांभई अचानकच स्फुरली.
असेल थोडा घाण वास, बिचारी आली तशीच विरली. विरली न विरली तोच बाका-बाकांवर जांभयांची
लाट उसळली. ती लाट तशी घाटावर बसून बघायला मजा आली. त्या सोन्यासारख्या केसांच्या मुलीच्या
नाजूक ओठांची उघडझाप, घाटावरची पाकोळी झाली! मी lecturer कडे लक्ष देण्यासाठी
position घेतली. तो जे जे बोलला, ते ते मी मनातल्या मनात पडताळलं. कारण मोठा होत गेलो
तसा विश्वास उडत गेलेला. लोकांवरचा, प्रेमावरचा, विज्ञानावरचा. स्वत:ला मतं पटल्याशिवाय
विश्वास ठेवू नको विज्ञानावर, असे मोठे सांगून गेले. या विधानावर कसा ठेवणार विश्वास?
पण तेवढा मी विचार नाही केला. आता जे जे बोलतं कुणी, ते ते पडताळावं लागतं आणि पटत
असेल तरच खिशात ठेवाव्ं असं. त्या equations च्या घाईगर्दीत मेंदू कुठेतरी टेकला -
थकला बिचारा - कलंडला. म्हटला, त्याच्या ध्यानात नाहीत सगळीच मुळाक्षरं…त्यामुळे शब्द
वाचता येत नाहीत-उच्चारता येत नाहीत-कळत नाहीत. असा टेकलेला मेंदू, मला थकलेला शेतकरी
भासला. बाभळीच्या झाडाला टेकून बिचारा घाम पुसणारा. त्याची कीव आली; तो माझा आहे म्हणून
माझीही कीव आली. पंधरा मिनीटांच्या समाधीत काही ज्ञानप्राप्ती नाही झाली. किती वर्षांचं
ज्ञान मी हरवून बसलो, त्याची तर गणतीच नाही. कुणी युरोपात १९५० साली असा-असा विचार
मांडला. तर १९५९ मधे अमेरिकेमधील शास्त्रज्ञांनी त्याचे विधान खोडून काढले आणि नवी
थिअरी मांडली वगैरे वगैरे. माझा मेंदू टेकलेला कुठेतरी १९८० साली आणि उठला तो २०१३
ला. आता मधलं काहीच महिती नाही…तर जोडणार कसा बांध, ठेवणार कसा विश्वास? वाटलं डोळे
मिटावेत नि पहावं आभाळाच्या भोकातून पडली तर एखादी सोन्यासारख्या केसांची मुलगी…पण
हे तेवढंच शक्य होतं जेवढे त्यातून पडणारे heartbreak झालेले बोके नि मेंदूविरहीत डोके!
मला त्या एका lecturer चं कौतुक वाटलं. १९५० पासून २०१४ पर्यंत तो टिकला. असाध्य ते
साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे. या माणसाने अभ्यास केला खरा, मी हुकलो.
मुकलो-भरकटलो-कलंडलो-लवंडलो. एक डुलकी, एक अपघात. झाला अपघात, मग घट़्ट केलं मन आणि
बसलो मुर्खासारखं उरलेल्या lecture भर…त्या केसाशी खेळत. घरी जाऊन अभ्यास केला मात्र…
पंकज कोपर्डे. २० फेब्रुअरी २०१४